पुणे – विविध मागण्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु केले आहे. सहा वर्षाचा कालावधी उलटूनही शासनाने महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नसल्याने गुरुवारपासून बेमुदत संप पुकारला आहे
शासनाने सहा वर्षांचा कालावधी उलटूनही महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. तसेच ज्या मागण्या तत्वत: मान्य केल्या होत्या. त्यासंदर्भात कोणताही शासन निर्णय प्रसिद्ध केला नाही. त्यामुळे नाईलाजास्तव जुलै महिन्यापासून टप्प्याटप्याने आंदोलनास सुरुवात केलेली आहे. त्यानुसार गुरुवारपासून राज्यातील सर्व महसूल कर्मचारी, अव्वल कारकून, लिपिक, वाहनचालक, शिपाई, कोतवाल बेमुदत संपावर जाणार असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आहेत