दूरसंचार कंपन्यांचा महसूल वधारणार

-कंपन्यांची संख्या कमी झाल्यामुळे स्पर्धेत घट

-कंपन्यांना 5जी सेवा देण्यासाठी गुंतवणूक वाढवावी लागणार

नवी दिल्ली  -दूरसंचार क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कंपन्या मागील दोन वर्षांपासून सलग घसरणीचा सामना करताहेत; परंतु चालू आर्थिक वर्षात 2019-20 मध्ये ही स्थिती बदलण्याचे संकेत क्रिसिलच्या एका अहवालात नोंदवले आहे. दूरसंचार क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कंपन्यांच्या महसुलात जवळपास 7 टक्‍क्‍यांनी वाढ होण्याचे संकेत आहेत.

2019-20 मध्ये कंपन्यांमधील शुल्क युद्धात काही प्रमाणात स्थिरता येत नवीन रिचार्ज प्लॅन वापरात येणार आहेत आणि त्यामुळे ग्राहकांच्या खर्चात होणाऱ्या वाढीवरच आगामी काळात महसुलात वाढ होणार आहे. त्याचाच फायदा कंपन्यांना होणार असल्याचे म्हटले आहे.

2019-20मध्ये मुख्य तीन दूरसंचार कंपन्यांमधील नेटवर्कचा विचार करता एकूण खर्च घटत जात 84,000 ते 90,000 कोटींवर राहण्याचा अंदाज आहे. तर दूरसंचार क्षेत्रात 2018-19 या कालावधीत एक लाख कोटी होता. दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांचा महसुलात लवकरच प्रति व्यक्‍ती महसुलात 11 टक्‍क्‍यांची वाढ होणार असल्याचे संकेत क्रिसिलकडून देण्यात आले आहेत.

सुरुवातीच्या काळात गरजेपेक्षा जास्त मोबाइलसेवा पुरवठादार कंपन्या होत्या. स्पर्धेमुळे या कंपन्यांना आपल्या सेवादरात वाढ करण्यास फारसा वाव नव्हता. मात्र आता या कंपन्याना 5 जी सेवा देण्यादाठी गुंतवणूक करावी लागणार आहे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.