पुणे – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) सर्वसाधारण उत्पन्नाच्या केवळ 20 टक्केच महसूल सध्या मिळत असल्याची आकडेवारी समोर आले. पुणे विभागातील सर्व 13 आगारांमध्ये मिळून एसटीला करोनापूर्वी सुमारे 1 कोटींचा महसूल मिळायचा.
परंतु, करोना भीतीने आर्थिक गणितही बिघडवले असून सध्या दररोज केवळ 20 लाखांचेच उत्पन्न मिळत आहे. पुणे विभागातील दररोजची प्रवासी संख्या साडेतीन लाखांवरून घसरून अवघ्या 23 हजारांवर आली.
दरम्यान, एसटी 22 ऑगस्टपासून सुरू झाली. सुरुवातीला एका सीटवर एकाच प्रवाशाला बसण्यास अनुमती होती. मात्र 19 सप्टेंबरपासून एका आसनावर दोन व्यक्तींना परवानगी दिली गेली असून त्यानंतरही संख्या वाढलेली नाही. करोना धसक्यामुळे प्रवासी प्रवास करण्यास धजावत नसून परिणामी एसटीच्या तोट्यात दिवसेंदिवस भर पडत आहे.