वाघोली : विजय अनिलराव जाचक फाउंडेशन वाघोली, भाजपा तसेच भारतीय डाक यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय योजनांचा मेळावा वाघोली मध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. महसूलमंत्र्यांनी शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठीचा भाजपा शहराध्यक्ष विजय जाचक यांनी राबवलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे गौरव उद्गार काढले.
यावेळी विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. शासनाच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विजय जाचक यांनी केलेल्या प्रयत्न बद्दल ग्रामस्थांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.यावेळी मान्यवरांच्या उपस्थित महसूलमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी याप्रसंगी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप दादा कंद , पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे, संदीप भोंडवे, सुदर्शन चौधरी, शाम गावडे, शांताराम कटके, अनंता कटके, संदीप जाधवराव ,दौलत पायगुडे युवराज दळवी,सुनील जाधवराव, शिवदास पवार, गणेश चौधरी, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या उपस्थित महसूलमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.