पीएमपीएमएलचे बनावट पास बनवून एक विद्यार्थी स्वस्तात विकत असल्याचे उघड 

पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) चे बनावट पास बनवून एक अल्पवयीन विद्यार्थी स्वस्तात विकत असल्याचे निष्पन्न झाले आहे. दक्ष वाहकामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. अमित सैताने (वय 35) असे त्या वाहकाचे नाव असून, त्यांनीच याबाबत बंडगार्डन पोलिसात फिर्याद दिली आहे.

11 जुलै रोजी सैताने स्वारगेट ते पुणे स्टेशन या पीएमपीएमएलमध्ये कर्तव्यावर होते. त्यावेळी एका विद्यार्थ्याने स्टेशन ते पावरहाऊस प्रवासात पास दाखविला. त्यांना तो पास संशयास्पद वाटला. त्यांनी विद्यार्थाकडे सखोल चौकशी केली असता तो पास बनावट असल्याचे निष्पन्न झाले. हा 750 रुपये किंमतीचा बास वडगावशेरी भागात राहणाऱ्या 17 वर्षीय मुलाने 650 रुपयांना तयार करून दिल्याचे त्याने सांगितले.

त्यानुसार मुख्य वाहतुक निरीक्षक कुसाळकर, तिकीट तपासणीस आणि पास विभागातील सेवक आनंदा पेटकर आणि पोलिसांच्या पथकाने त्या विद्यार्थ्याला स्वस्तात बनावट पास बनवून देताना पकडले आहे. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असण्याची शक्‍यता आहे. त्याने आणखी किती जणांना असे बनावट पास बनवूण देऊन शासनाची फसवणूक केल्याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलीस उपनिरीक्षक पाटील अधिक तपास करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.