नेवासा – ‘घरोघरी तिरंगा’ फडकावून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या धुमघडाक्यात साजरा करण्यात आला. यावेळी सरकारने स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्याचे यंदा यशस्वी नियोजन केले होते. मात्र नेटकऱ्यांतून राजकिय नेतेमंडळीवर टिका केली जात होती.
आपल्या पक्षाचा झेंडा घरोघरी लावण्यासाठी फुकट वाटतात ? आणि तिरंगा ध्वज विकत घेण्यास सांगतात ? अशी परखड टिका नेटकऱ्यांतून जोरदारपणे केली जात होती. मात्र या टिकेला लाजविल अशी कामगारी रामडोह (ता.नेवासा) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन भारत गुंजाळ यांनी आपल्या सोसायटीकडून ग्रामपंचायतीला तिरंगा ध्वज खरेदी करण्यासाठी ‘अर्थिक’ मदत करून केली.
ग्रामपंचायतीच्यावतीने तिरंगा ध्वज ग्रामस्थांना मोफत देण्यात आले व पुन्हा या तिरंगा ध्वजाची ग्रामिण भागातील नागरीकांकडून नकळत विटंबना होवू नये याची खबरदारी घेण्यासाठी रामडोह सोसायटीचे चेअरमन भारत गुंजाळ, व्हॉईस चेअरमन बाळासाहेब बोरुडे, सरपंच ज्ञानेश्वर बोरुडे, माजी सरपंच राजेंद्र परसैय्या, मुळा साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब गोरे, ग्रामविकास अधिकारी शेळके भाऊसाहेब, सचिव देऊतकर यांनी शक्कल लढवून मोफत दिलेले तिरंगा ध्वज पुन्हा माघारी आणून द्या आणि झेंड्याचे पैसे घेवून जा, अशी घोषणा केलेली होती.
त्यामुळे स्वयंस्फुर्तीने अनेकांनी ध्वज ग्रामपंचायतीकडे जमा केले तर ज्यांनी केले नाही त्यासाठी दोन कर्मचारी लावून तिरंगा ध्वज जमा करुन तिरंगा ध्वजाची आण.. बाण… अन् शान वाढविण्यासाठी रामडोह (ता.नेवासा) सोसायटीचे चेअरमन भारत गुंजाळ यांच्या विशेष कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.