लुटलेला पैसा परत करा आणि पाकिस्तान सोडा

झरदारी, शरीफ यांना इशारा

इस्लामाबाद -पाकिस्तानचे माजी अध्यक्ष असिफ अली झरदारी आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी लुटलेला पैसा परत करावा आणि देश सोडावा, असा इशारा त्या देशाचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिला आहे.

भ्रष्टाचाराचे आरोप असणारे झरदारी आणि शरीफ हे दोघेही सध्या तुरूंगात आहेत. शरीफ यांची उपचारासाठी परदेशी जाण्याची इच्छा आहे. त्याचा संदर्भ देऊन इम्रान म्हणाले की, चोरलेला पैसा परत करत नाहीत; तोपर्यंत भ्रष्टाचाराबद्दल दोषी ठरलेल्यांना पाकिस्तानबाहेर जाऊ दिले जाणार नाही. शरीफ यांना परदेशी जायचे असेल तर त्यांनी पहिल्यांदा लुटलेला पैसा परत करावा.

झरदारी यांनीही तसेच करावे. त्यांना कुठलीही माफी दिली जाणार नाही. पैशांची अफरातफर करणाऱ्यांना व्हीआयपींसारखी वागणूक दिली जात आहे. मात्र, त्यांना साधारण कैद्यांना ठेवतात त्याच तुरूंगात ठेवण्याची सूचना मी केली आहे, असेही इम्रान यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.