“कसोटी जिंदगी की’ या सिरियलमध्ये सूनेच्या रोलमुळे प्रसिद्ध झालेली श्वेता तिवारी आता तीन वर्षानंतर टेलिव्हिजन वर्ल्डमध्ये परतते आहे. “मेरे डॅड की दुल्हन’ या सिरियलमध्ये ती एका पंजाबी मुलीचा रोल करते आहे. “बिग बॉस’मध्ये विजयी झाल्यानंतर श्वेताने एक मोठा ब्रेक घेतला होता. आता प्रेक्षकांसमोर पुन्हा येण्यासाठी ती आतूर झाली आहे. “मेरे डॅड की दुल्हन’ या सिरियलमध्ये ती अगदी बिनधास्त बोलणारी मुलगी आहे. या रोलसाठी तिने आपले केसही बारीक कापलेले आहेत.