मेलबर्न – इंग्लंडविरुद्धच्या ऍशेस कसोटी मालिकेसाठी संघात स्थान मिळणार नसल्याचे चित्र दिसत असल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिन्सनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
ऑस्ट्रेलियाकडून पॅटिन्सनने 21 कसोटी सामने खेळताना 81 बळी घेतले आहेत. तसेच 15 एकदिवसीय सामन्यांत 16 बळी आणि 4 टी-20 सामन्यांत 3 बळी घेतले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जरी निवृत्ती घेतली असली तरीही व्हिक्टोरिया संघाकडून स्थानिक क्रिकेट खेळत राहणार असल्याचे त्याने स्पष्ट केले.
याच संघाकडून सराव करीत असताना काही दिवसांपूर्वी त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. ब्रिस्बेन येथे डिसेंबर 2011 साली न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पॅटिन्सनने पदार्पण केले होते.
कारकिर्दीतील अखेरचा कसोटी सामना सिडनीत जानेवारी 2020 साली न्यूझीलंडविरुद्धच त्याने खेळला. सप्टेंबर 2015 साली लीड्स येथे इंग्लंडविरुद्ध तो अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता.