स्थायीचे आठ सदस्य निवृत्त

खैरे, येवले, कवडे, बारस्कर, घुले, बोरकर, कोतकरांचा समावेश 

नगर  – महापालिकेच्या स्थायी समितीचे आठ सदस्य निवृत्त झाले. यामध्ये भाजप व कॉंग्रेसचे प्रत्येकी एक तर शिवसेना, राष्ट्रवादीचे प्रत्येकी तीन असे आठ सदस्य शुक्रवारी (दि.31) रोजी निवृत्त झाले. स्थायी समितीच्या सभेत लहान मुलांच्या हाताने चिठ्ठ्या काढून निवृत्त सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली.

सावेडी येथील महात्मा ज्योतीबा फुले प्राथमिक विद्यालयातील राजश्री रमेश सोनवणे व प्रतिक्षा अनिल भालेराव यांच्या हस्ते निवृत्त सदस्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. यामध्ये निवृत्त सदस्यांमध्ये संध्या पवार (कॉंग्रेस), विद्या खैरे, ज्ञानेश्‍वर येवले, गणेश कवडे (शिवसेना), दीपाली बारस्कर, अविनाश घुले, शोभा बोरकर (राष्ट्रवादी), मनोज कोतकर (भाजप) यांचा समावेश आहे. उद्या शनिवारी दुपारनंतर ते समितीतून निवृत्त होतील.

शुक्रवारी सकाळी 11 वाजता स्थायी समितीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत महापालिकेच नियमानुसार स्थायी समितीचे आठ सदस्य निवृत्त झाले. स्थायी समितीसदस्यांच्या कार्यकाळाची मुदत 31 जानेवारीला संपणार आहे. त्यामुळे एकूण 16 सदस्यांपैकी 8 सदस्यांच्या निवृत्तीसाठी 31 रोजी सभा बोलाविण्यात आली आहे. स्थायी समितीत शिवसेना 6, राष्ट्रवादी 5, भाजप 3,बसप 1, कॉंग्रेस 1 असे पक्षीय संख्याबळ आहे.

भाजप-आशा काळे, सोनाली चितळे, मनोज कोतकर, शिवसेना- योगीराज गाडे, गणेश कवडे, अमोल येवले, सुभाष लोंढे, सुवर्णा जाधव, विद्या खैरे, राष्ट्रवादी- अविनाश घुले, गणेश भोसले, दीपाली बारस्कर, कुमार वाकळे, शोभा बोरकर, कॉंग्रेस- संध्या पवार, बसप- मुदस्सर शेख हे 16 सदस्य स्थायी समितीत आहेत.

मनपा सत्तेत भाजपला पाठिंबा दिल्याच्या बदल्यात बसपला दोन वर्षे स्थायी समिती सभापतीपद देण्याचा निर्णय झालेला आहे. पहिले एक वर्षे मुदस्सर शेख व नंतरची एक वर्षे अश्‍विनी जाधव या सभापती असा फॉर्म्युला बसपअंतर्गत ठरलेला आहे. मुदस्सर शेख हे विद्यमान सभापतीपदी आहेत. वर्षभराचा कार्यकाल पूर्ण झाल्याने 31 रोजी सभेत आठ सदस्य निवृत्त झाले मात्र त्यांच्या नावाची चिठ्ठी न निघाल्याने त्यांचे पद आबादीत राहिले.

महापालिकेच्या अर्थकारणात स्थायी समितीची भूमिका महत्वाची आहे. लाखोंच्या निविदांना समितीत मंजुरी दिली जाते. त्यामुळे या समितीवर जाण्याचा नगरसेवकांचा प्रयत्न असतो. या निवृत्त झालेल्या आठ सदस्यांच्या जागेवर नव्याने त्याच पक्षातील आठ सदस्य निवडण्यासाठी स्वतंत्र महासभा बोलावण्यात येणार आहे. उर्वरित आठ सदस्य पुढील वर्षी निवृत्त होणार आहेत.
निवृत्त सदस्यांच्या जागेवर नवीन सदस्य निवडण्यासाठी आयुक्तांच्या स्वाक्षरीने महासभेकडे प्रस्ताव पाठवला जाणार आहे. यानंतर उर्वरित आठ सदस्यांच्या निवडी होणार आहेत. या निवडीसाठी निवृत्त झालेल्या सदस्यांच्या पक्षांचा गटनेता आपल्या पक्षांतील सदस्यांच्या नावाची शिफारस करतात. यानंतर त्यानावर महासभेत मंजूरी देवून निवड केली जाणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.