बंगळुरू – कर्नाटकातील कन्नड जिल्ह्यात स्वातंत्र्यदिनानिमीत्त ध्वजारहोण करताना माजी सैनिकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. धजारोहण करताना ते बेशुद्ध होऊन खाली पडले, त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. गंगाधर गौडा असे मृत्यू पावलेल्या माजी सैनिकाचे नाव आहे.
आज देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. यावेळी कदाबू तालुक्यातील कुतरूपड्डी गावात ध्वजरारोहणाचे आयोजन करण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौडा हे ध्वजारोहण कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांनी ध्वजारोहण केल्यानंतर सलामी देण्याची घोषणा केली आणि त्याचवेळी ते जमिनीवर कोसळले. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.