विभागीय आयुक्तांची महिती
पुणे – जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनाकडून पावले उचलली असून रेमडेसिवीर इंजेक्शन किरकोळ विक्री येत्या 30 एप्रिलपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांनाच तेथील मेडिकलमधून रेमडेसिवीर उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
काही रुग्णांना आवश्यक नसताना रेमडेसिवीरचे इंजेक्शन दिले जाते. या इंजेक्शनच्या किरकोळ विक्रीमुळे टंचाई निर्माण झाली आहे.
रुग्णांच्या नातेवाईकांची हे इंजेक्शन घेण्यासाठी मेडिकलच्या बाहेर रांगा लावाव्या लागत आहे.
याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर रेमडेसिविर हे केवळ रुग्णालयातील मेडिकलमध्ये उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.