सेट परीक्षांचा निकाल यावर्षी ६.७८ टक्के

 निकाल शुक्रवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाहीर होणार

पुणे: महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांसाठी २३ जून २०१९ रोजी झालेल्या सेट परीक्षांचा निकाल ६.७८ टक्के इतका लागला आहे. या परीक्षेला ७९८७९ उमेदवार बसले होते, त्यापैकी ५४१५ उत्तीर्ण झाले आहेत. हा निकाल शुक्रवारी (११ ऑक्टोबर) दुपारी २ नंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाहीर होणार आहेत.

हा निकाल वेबसाईटवर प्रसिद्ध केल्यानंतर तो http://setexam.unipune.ac.in/ या लिंकवर पाहता येणार आहे. उत्तीर्ण उमेदवारांनी निकाल जाहीर झाल्यापासून एक महिन्याच्या कालवधीत, आवश्यक असलेली स्व-साक्षांकित (self-attested) पात्रता प्रमाणपत्रे आँनलाईन अर्जासह सादर करणे अपेक्षित आहे, अशी माहिती या सेट परीक्षेचे समन्वयक प्रा. बी. पी. कापडणीस यांनी दिली.

उमेदवारांनी सादर करावयाच्या प्रमाणपत्रांमध्ये पुढील कागदपत्रांचा समावेश आहे

अ. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षीची किंवा समकक्ष परीक्षेची गुणपत्रिका.
ब. नाव बदलले असल्यास लग्नाचे प्रमाणपत्र / गॅझेटची प्रत.
क. जात प्रमाणपत्र / वैधता प्रमाणपत्र.
ड. आवश्यक प्रवर्गांसाठी नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र.
इ. दृष्टीशी संबंधित किंवा शारीरिकदृष्ट्या विशेष व्यक्तिंसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र.
ई. अनाथ किंवा ट्रान्सजेंडर गटात मोडणाऱ्या व्यक्तिंसाठी आवश्यक प्रमाणपत्र.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.