नवी दिल्ली – अनुत्पादक मालमत्तेपोटी तरतूद केल्यामुळे आयसीआयसीआय बॅंकेच्या स्टॅंडअलोन नफ्यात घट होऊन चौथ्या तिमाहीत तो केवळ 969 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी चौथ्या तिमाहीत स्टॅंडअलोन पातळीवर बॅंकेला 1020 कोटी रुपयांचा नफा झाला होता.
मात्र, आयसीआयसीआय बॅंक समूहाच्या नफ्यात चौथ्या तिमाहीत 2.45 टक्क्यांची वाढ होऊन तो 1,170 कोटी रुपये झाला आहे. जो की गेल्या वर्षी चौथ्या तिमाहीत 1,142 कोटी रुपये होता. एकूण महसूल चौथ्या तिमाहीत 36,784 कोटी रुपये झाला आहे. जो की गेल्या वर्षी या तिमाहीत ते 33,760 कोटी रुपये होता. बॅंकेची ढोबळ अनुत्पादक मालमत्ता 6.70 टक्के आहे तर निव्वळ अनुत्पादक मालमत्ता 2.06 टक्के आहे.
बॅंकेने शेअरबाजाराला कळविलेल्या माहितीत म्हटले आहे की, गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी फुल आणि निव्वळ अनुत्पादक मालमत्ता बरीच कमी झाली आहे.