नवी दिल्ली : राज्याने पाठवलेल्या तपशीलाच्या आधारावर येत्या दोन दिवसांत करोना संदर्भातील झोनची फेरररचना करण्यात येईल, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
झोनच्या वर्गवारीची यादी 30 एप्रिलला बनवली होती. राज्यांनी पाठवलेल्या तपशीलाच्या आधारे ती तपासण्यात येईल. त्यानंतर त्याचे विश्लेषण करण्यात येईल. त्यासाठी आणखी दोन दिवस लागतील. त्यानंतर ही सुधारीत यादी प्रकाशित करण्यात येईल, असे केंद्र सरकारने स्पष्ट करण्यात आले आहे.