प्रतिबंधात्मक आदेश जारी

विधानसभा निवडणूकीसाठी जिल्ह्यातील बारा मतदारसंघात 21 ऑक्‍टोबर रोजी मतदान पार पडणार आहे. खुल्या, निर्भय, शांततामय, न्याय वातावरणात व सुरळीतपणे मतदान पार पडण्यासाठी जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 अन्वये जिल्हा महसूल हद्दीच्या कार्यक्षेत्रात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

मतदानाच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीस मतदान केंद्रामध्ये किंवा मतदान केंद्रापासुन 100 मीटर अंतराच्या आतील कोणत्याही सार्वजनिक वा खाजगी जागेमध्ये मते मिळविण्यासाठी प्रचार करता येणार नाही, मतदाराकडे मताची याचना करता येणार नाही, विशिष्ट उमेदवारास मत न देण्याबद्दल मतदाराचे मन वळवता येणार नाही, शासकीय सुचने व्यतिरिक्त निवडणुकीशी संबंधित अशी कोणतीही सूचना अथवा खूण प्रदर्शित करत येणार नाही.

मतदान केंद्रामध्ये किंवा त्याच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा त्याच्या आसपासच्या भागातील कोणत्याही सार्वजनिक वा खाजगी जागेमध्ये ध्वनिक्षेपक अथवा ध्वनिवर्धक वाजविता येणार नाही, मतदान केंद्र परिसरात सार्वजनिक अथवा खाजगी जागेत आरडाओरड अथवा गैरशिस्तीने वागता येणार नाही. मतदान केंद्रापासून 200 मीटर अंतराच्या परिसरात मंडप उभारण्यास तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते यांना बसण्यासाठी टेबल व खुर्च्या लावण्यात येणार नाही. मतदान केंद्र परिसरात 100 मीटर आत असलेली सर्व दुकाने, आस्थापना मतदानाच्या दिवशी बंद राहतील. मात्र, अत्यावश्‍यक सेवा, मेडीकल, दवाखाना/हॉस्पिटल, दूध डेअरी यावर या आदेशान्वये निर्बंध लागू नसतील. मतदान केंद्रापासून 100 मीटर परिसरात निवडणूक कर्तव्यावर नियुक्त अधिकारी वगळता इतरांना सेल्युलर फोन, कॉडलेस फोन नेण्यास परवानगी नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)