राज्यात करोनाचा उद्रेक! मुंबई लोकलवर पुन्हा निर्बंध? लवकरच होणार मोठी घोषणा

मुंबई  – राज्यासह मुंबईतही करोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये करोनाबाधितांची संख्या दररोज 10 हजारांच्या पटीत वाढत आहे. यामुळे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल सेवा ही लॉकडाऊन काळात बंद होणार नसून गर्दीचे विभाजन करण्याचे काम केले जाईल, असे म्हटले होते. परंतु आता त्यांनी लोकलवर पुन्हा एकदा निर्बंध लागू केले जाण्याची शक्‍यता वर्तवली आहे.

राज्य सरकार मुंबईच्या लोकलवर करोना रुग्णसंख्या वाढीमुळे पुन्हा एकदा निर्बंध लादण्याच्या तयारीत असल्याचेविजय वडेट्टीवार यांनी सांगितले. मुंबईचा लोकलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने करोनाचा प्रसार वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पूर्णपणे लोकल बंद करावी की, मागच्यावेळी असलेले निर्बंध पुन्हा लागू करावेत, यावर राज्य सरकार विचार करत असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबईत दररोज 10 हजार करोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत त्यामुळे मुंबईतील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार आता मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकलवर कोणते निर्बंध आणणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.