Chess : ग्लोबल बुद्धिबळाची आनंदकडे जबाबदारी

चेन्नई – बुद्धिबळ खेळाच्या पहिल्यावहिल्या ग्लोबल बुद्धिबळ लीगची संपूर्ण जबाबदारी टेक महिंद्राने भारताचा माजी विश्‍वविजेता ग्रॅण्डमास्टर विश्‍वनाथन आनंद याच्याकडे सोपवली आहेत.

जगातील मानांकित व्यावसायिक बुद्धिबळपटूंचा समावेश असलेले आठ संघ यात सहभागी होत आहेत. प्रत्येक संघात पुरुष, महिला आणि कनिष्ठ खेळाडूंचा समावेश असेल. राऊंड रॉबिन तसेच साखळी पद्धतीने हे सामने होणार असून, स्पर्धेचा आराखडा येत्या काही दिवसांत जाहिर केला जाणार आहे.

जागतिक दर्जाच्या या स्पर्धेचे संयोजनपद भारताकडे आहे. या स्पर्धेसाठी भारतीय ग्रॅंडमास्टर आनंदकडे सल्लागार, भागीदार, मागदर्शक आणि लीगला आकार देण्याच्या जबाबदाऱ्या असतील.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.