Chhagan Bhujbal | राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री उशिरा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केल्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. जेथे त्यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. अनेक राजकीय नेत्यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनीही या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.
छगन भुजबळ म्हणाले, “सिद्दिकी यांच्या हत्येमागे राजकारण आहे असं मला वाटत नाही. यामध्ये काही व्यवहार किंवा खंडणी असा काहीतरी प्रकार मला दिसून येत आहे. पोलिसांना सर्व काही कळतंय पोलिसांनी त्याचा बीमोड केला पाहिजे. पोलिसांचं धैर्य वाढवलं पाहिजे. कायदा व सुव्यवस्था राखणे फक्त गृहमंत्री नाही तर मुख्यमंत्र्यांची देखील जबाबदारी आहे. यासाठी पोलीस खात्यात योग्य प्रकारचे अधिकारी नेमले गेले पाहिजेत.”
“बाबा सिद्दीकी यांना अनेक वर्षापासून ओळखत होतो. त्यांना धमकी देण्यात आल्यानंतर त्यांना वाय सुरक्षा सुरक्षा देण्यात आली होती. मात्र, त्यांना सुरक्षा देऊन देखील काही होत नाही. धमक्या आल्या होत्या तर काळजी घेतली पाहिजे होती. धमकी कोणी दिली होती याचा देखील तपास करायला पाहिजे होता,” असेही छगन भुजबळ म्हणाले.
10 ते 20 हजार रुपयांमध्ये ही पोरं हत्या करतायत – छगन भुजबळ
“भायखळा येथील तालुका प्रमुखांची देखील निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. मुंबई पोलिसासाठी हे एक चॅलेंज आहे. 10 ते 20 हजार रुपयांमध्ये ही पोरं हत्या करत आहेत. मुंबई पोलिसांना माझी विनंती आहे की, आपलं नाव खराब होत आहे ते सांभाळण्याची जबाबदारी तुमची आहे. कुठल्याही दबावाला बळी न पडता कठोरपणे या सर्वांचा बंदोबस्त झाला पाहिजे. असे करताना गृहमंत्र्यांनी पोलिसांना फ्री हँड दिला पाहिजे, मी तुमच्या पाठीमागे उभा आहे असं सांगितलं पाहिजे. जे कोणी गुंड आहेत त्यांची विल्हेवाट लावा. गुन्हेगारांना शिक्षा मिळाली मिळाली पाहिजे. ही जबाबदारी फक्त गृहमंत्र्यांची नाही तर मुख्यमंत्र्याची देखील आहे,” असे छगन भुजबळ यांनी म्हंटले आहे. Chhagan Bhujbal |
हेही वाचा :