पाच हजार झाडे लावण्याचा, जगविण्याचा संकल्प

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक भोंडवे यांचा उपक्रम

पिंपरी – माजी उपमुख्यमंत्री तथा विधिमंडळ गटनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे नगरसेवक मोरेश्‍वर भोंडवे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण करण्यात आले. तसेच रावेत परिसरात पाच हजार झाडांचे वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन करण्याची जबाबदारी ज्येष्ठ नागरिक संघ आणि मोरेश्‍वर भोंडवे मित्र परिवाराने घेतली आहे.

रावेत प्राधिकरणातील आठवडे बाजार मैदानात विविध प्रकारच्या स्वदेशी रोपांची लागवड करण्यात आली. परिसरातील विविध ठिकाणी राष्ट्रवादीचे नगरसेवक मोरेश्‍वर भोंडवे यांच्या हस्ते कडुनिंब, पिंपळ, वड असे बहुपयोगी वृक्ष लावण्यात आले. यावेळी आर. आर. शिंदे, एच. आर. ठाकूर, अण्णा देशपांडे, किसनराव बंड, ऍड सोमनाथ हरपुडे, समीर चौधरी, बाबा पाटील, पवन खटावणे, प्रभू कांगणे, ज्ञानदेव माने, किशोर चौधरी, विठ्ठल कांबळे, डॉ रमेश शेटे, प्रकाश जगताप, शिवाजी कुंभार, गंगाराम नेवसे, रमेश माने, भूपाल बसनवार, नीलम शिंदे आदींसह माऊली ज्येष्ठ नागरिक संघ, तीर्थस्वरूप ज्येष्ठ नागरिक संघ, गुरुद्वारा ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी आणि सदस्य तसेच विविध सोसायट्यांचे चेअरमन व नागरिक उपस्थित होते.

बहुपयोगी वृक्षांची लागवड यावेळी नगरसेवक मोरेश्‍वर भोंडवे म्हणाले की, वैश्‍विक उष्णतेचे वाढणारे प्रमाण व हवामानातील बदल यांतील तीव्रता व परिणामकारकता कमी करण्याच्या उद्देशाने आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करायला हवे.

शुद्ध हवा, मुबलक पाणी मिळविण्यासाठी तसेच जमिनीची धूप होऊ नये, यासाठी झाडांची मोठी मदत होते. तसेच प्रत्येक झाडाचा औषधी उपयोग आहे. म्हणून बहुपयोगी झाडांची लागवड करायला हवी, असे मोरेश्‍वर भोंडवे म्हणाले. आपणच आपले पर्यावरण सांभाळायला हवे, या उद्देशाने अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रावेत परिसरात पाच हजार झाडांचे वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन करण्याची जबाबदारी ज्येष्ठ नागरिक संघ आणि मोरेश्‍वर भोंडवे मित्र परिवाराने घेतली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)