जलपर्णी काढणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा ठराव

  • स्थायीतील सदस्य आक्रमक
  • डॉ. रॉय यांच्यावरही कारवाई करावी

पिंपरी – शहरामध्ये वाहणाऱ्या मुळा, पवना व इंद्रायणी नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर जलपर्णी वाढली आहे. ही जलपर्णी काढण्यासाठी मेसर्स साई फ्रेट प्रायव्हेट लिमिटेड यांना कंत्राट देण्यात आले आहे. मात्र, ते ठरलेल्या अटी-शर्तीनुसार कामकाज करत नाही. कंत्राट देऊनही शहरातील नद्यांमध्ये जलपर्णी तशीच आहे. त्यामुळे त्या ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट करावे व आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांच्यावर कारवाई करावी यासाठी स्थायीत ठराव करून तो आयुक्तांकडे कारवाईसाठी पाठविण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेची स्थायी समितीची सभा आज होती. सभेच्या अध्यक्षस्थानी ऍड. नितीन लांडगे होते. ही सभा तहकूब करण्यात आली. तहकूब करण्यापूर्वी शहरातील नद्यांमध्ये वाढत असलेल्या जलपर्णीबाबत चर्चा झाली. शहरातील नद्यांची गटारगंगा झाली असून मोठ्या प्रमाणावर जलपर्णी वाढली आहे. त्यामुळे नदीकाठच्या परिसरात डासांचा उपद्रव वाढला आहे. यावर आरोग्य अधिकारी डॉ. के अनिल रॉय काहीच करत नसल्याने ठेकेदाराचे फावले आहे अशी व्यथा सदस्यांनी मांडली. या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करावे व त्याला पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी ठराव करण्यात आला. तो ठराव आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे पुढील कारवाईसाठी पाठविला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.