आमदार दत्तात्रय भरणे यांच्या मंत्रीपदाबाबत ठराव

इंदापुरात राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक; पक्षाध्यक्षांकडे प्रत पाठविणार

रेडा – इंदापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने आमदार दत्तात्रय भरणे यांना राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद द्यावे, असा एकमुखाने शेकडो पदाधिकाऱ्यांनी ठराव केला आहे तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांना विधान परिषद परिषदेवर घेण्यात यावे, असाही ठराव इंदापूर तालुक्‍यातील पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

या ठरावाच्या प्रती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना पाठवण्यात आला आहे.
इंदापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसची तालुक्‍यातील पदाधिकारी यांची विशेष बैठक आज इंदापूर शहरात आयोजित करण्यात आली होती. ही बैठक पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

या बैठकीत सालाबाद प्रमाणे पवार चारीटेबल ट्रस्ट यांच्यावतीने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्यात आले. यामध्ये नायब शिवांजली रविशंकर (भिगवन), पंढरीनाथ नरोटे काझड, निखिल सुरेश घाडगे (सपकळवाडी), अनुराधा शिवाजी सपकाळ, ओंकार परशुराम जामदार (बेलवाडी), गौरी रामदास भोंग, योगेश शिवाजी भोंग (निमगाव केतकी), खाजासाब सय्यद (भवानीनगर), ऋषिकेश धनंजय होनराव (लाखेवाडी), पवार परशुराम सुनील, स्नेहल दीपक शेलार (इंदापूर), स्वप्नील अंकुश सावळकर (निमगाव केतकी), सानिका महेंद्र राऊत (निमगाव केतकी) यांना शिष्यवृत्तीचे धनादेश जिल्हाध्यक्ष गारटकर यांच्या हस्ते देण्यात आले.

तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, नगरपालिकेचे नगरसेवक श्रीधर बाब्रस, माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव ननवरे, इंदापूर तालुका राष्ट्रवादी उपाध्यक्ष तात्यासाहेब वडापुरे, इंदापूर शहराध्यक्ष अनिल राऊत, महिला तालुकाध्यक्ष छाया पडळसकर, स्मिता पवार, भिगवण शहराध्यक्ष सचिन बोगावत, महिला शहराध्यक्ष उमा इंगोले, किसनराव जावळे, संपतराव पवार, जिल्हा परिषद सदस्य हनुमंतराव बंडगर, दादासाहेब वनवे, वालचंदनगर शहराध्यक्ष अमर निंबाळकर, इक्‍बाल शेख वसंतराव आरडे, राजेंद्र चौगुले, राजेश शिंदे, अशोक गानबोटे, महादेव शिंदे, दत्तात्रेय बाबर, दिलीप वाघमारे, दादासाहेब सोनवणे, महादेव लोखंडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांसाठी मदतीचे आवाहन…
राज्यातील शेतकरी उद्‌वस्त झाला आहे, प्रचंड नुकसान झालेले आहे,अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी निकामी झालेल्या आहेत. शेतकरी बि-बीयाणे खरेदीसाठीही महाग झाला आहे. जनावरांना जगवता येत नाही आणि त्यातच शेतकऱ्यावर कर्जाचा बोजा वाढत चालत असल्याने ह्या जगाच्या पोशिंद्याला कसेही करून सावरले पाहिजे, त्याच्या कुटुंबाला आधार हात द्यावाच लागेल त्याच्या मुलाबाळांचे शिक्षण थांबायला नको, सरकार काय मदत देईल ती देईल पण आदरणीय पवार साहेबांचे कार्यकर्ते म्हणून शेतकऱ्यांसाठी काहीतरी केले पाहिजे,

या दृष्टिकोनातून प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावावा अशी सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी माडताच तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील यांनी तालुक्‍यातून मदत गोळा करून तत्काळ जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे सुपूर्त करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)