मुंबई – मुंबई शहरात मान्सूनच्या पहिल्याच पावसाने मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे. असे असाताना आज एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शहरातील मालाडमध्ये रहिवासी चारमजली इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १७ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ८ लहान बालकांचा समावेश आहे.
न्यू कलेक्टर कंपाऊंड मध्ये ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई महापालिकेसह इतर प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे.
Maharashtra: Search and rescue operation continues in New Collector compound, Malad West of Mumbai, where residential structures collapsed last night. 11 people died, 7 injured.
Visuals from the spot, this morning. pic.twitter.com/ct7HhErNHF
— ANI (@ANI) June 10, 2021
दुर्घटनेतून रेस्क्यू करण्यात आलेल्या जखमींना शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या इमारतीत एकूण दोन ते तीन कुटुंब याठिकाणी राहत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
खबरदारी म्हणून इमारतही रिकामी करण्याचा निर्णय घेण्यात आला. येथील रहिवाशांना तातडीने अन्यत्र हलवण्यात येत असून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरु आहे. ढिगाऱ्याखाली काहीजण दबले असल्याची भीती असून मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे.
#Maharashtra | A house collapsed in Malad West area of Mumbai at around 11 pm. Five people have been rescued safely. No injury reported so far. Rescue operation is underway: Brihanmumbai Municipal Corporation (BMC)
— ANI (@ANI) June 9, 2021
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पालकमंत्री अस्लम शेख घटनास्थळी पोहोचले होते. यावेळी त्यांनी मुसळधार पावसामुळे इमारत कोसळल्याची माहिती दिली. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, रात्री ११ वाजून १० मिनिटांनी ही दुर्घटना घडली. पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी असून बचावकार्य सुरु आहे.
Visuals of search & rescue operation by Fire brigade in a building collapse at Malvani Gate No 8,Malad (W) last night.
A portion of 2nd & 3rd floor of a Gr.+ 3 residential building collapsed on adjacent G+1 floor chawl injuring 17 people. Unfortunately 9 reported dead so far pic.twitter.com/x9dYx5vmOa
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 10, 2021