मुंबई: राज्यात नवे सरकार स्थापन होऊन साडेतीन महिने उलटले तरी प्रशासकीय खांदेपालटाचा सिलसिला थांबण्याचे नाव घेत नाही. गेल्या आठवड्यात सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या, आणि आता पुन्हा पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी झाले आहेत. यामध्ये पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एच. पालवे यांची महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली आहे, तर मनोज रानडे यांना पालघरचे नवे सीईओ बनवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, मध्य प्रदेश संवर्गातील २०२० बॅचच्या आयएएस अधिकारी अंजली रमेश यांना महाराष्ट्रात आणून हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नेमले आहे.
नव्या बदल्यांची यादी –
बी. एच. पालवे (IAS: SCS: 2013) – पालघर झेडपी सीईओ यांची महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ, मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली.
मनोज रानडे (IAS: SCS: 2024) – संचालक, नगर प्रशासन, मुंबई यांची पालघर झेडपी सीईओ म्हणून नियुक्ती.
शुभम गुप्ता (IAS: RR: 2019) – सांगली महानगरपालिका आयुक्त यांची विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूर येथे सदस्य सचिव म्हणून बदली.
अंजली रमेश (IAS: RR: 2020) – मध्य प्रदेश संवर्गातून महाराष्ट्रात बदली, हिंगोली झेडपी सीईओ म्हणून नियुक्ती.
झेनिथ चंद्र देवंथुला (IAS: RR: 2022) – सहाय्यक जिल्हाधिकारी, वरोरा, चंद्रपूर यांची प्रकल्प अधिकारी, ITDP, किनवट आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, किनवट, नांदेड म्हणून नियुक्ती.
यापूर्वीच्या बदल्या –
आंचल गोयल (IAS: RR: 2014) – अतिरिक्त आयुक्त, नागपूर यांची मुंबई शहर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती.
अंकित (IAS: RR: 2019) – जळगाव झेडपी सीईओ यांची छत्रपती संभाजीनगर झेडपी सीईओ म्हणून बदली.
मीनल करनवाल (IAS: RR: 2019) – नांदेड झेडपी सीईओ यांची जळगाव झेडपी सीईओ म्हणून नियुक्ती.
कवली मेघना (IAS: RR: 2019) – प्रकल्प संचालक, ITDP, किनवट यांची नांदेड झेडपी सीईओ म्हणून बदली.
करिश्मा नायर (IAS: RR: 2021) – प्रकल्प संचालक, ITDP, जव्हार यांची नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती.
रणजित मोहन यादव (IAS: RR: 2022) – सहाय्यक जिल्हाधिकारी, कुरखेडा, गडचिरोली यांची प्रकल्प अधिकारी, ITDP, गडचिरोली आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, गडचिरोली म्हणून बदली.
नव्या सरकारच्या काळात प्रशासनातील सातत्याने होणारे हे बदल चर्चेचा विषय ठरत आहेत!