राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राची हवा
कोपरगाव (प्रतिनिधी) – शिर्डी येथे २३ वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन राहाता तालुका कुस्ती तालीम संघ यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी हाराष्ट्राची रेश्मा हिने सुवर्णपदक पटकावून दुसऱ्या दिवशीही महाराष्ट्राचा झेंडा फडकावला आहे. २६ राज्यांमधील शेकरू कुस्तीपटूंनी यामध्ये सहभाग नोंदवला होता. पहिल्या दिवशीच महाराष्ट्राचा सिकंदर शेख याने सुवर्णपदकाची कमाई केली तर दुसऱ्या दिवशी कोल्हापूरची रेश्मा माने हिने सुवर्णपदक पटकावून कुस्तीच्या मॅट वरती महाराष्ट्राचा झेंडा रोवला.
२६ सप्टेंबरपासून तीन दिवस सुरू असलेल्या कुस्ती स्पर्धांमध्ये दुसऱ्या दिवशी महिला कुस्तीपटू ची फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेमध्ये कोल्हापुरच्या रेश्मा माने हिने ६२ किलो वजन गटात दिल्लीच्या अनिता हिचा चपळाईने पराभव करत सुवर्णपदकाची मानकरी ठरली.
तसेच, शिर्डी येथील २३ वर्षा खालील मल्लांच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धांचे आयैजन करण्यात आले आहे. महिलांच्या विविध गटामधून विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे ७६ किलो वजन गटात प्रथम पूजा (हरियाणा), द्वितीय नवज्योत कौर (पंजाब),तृतीय डॉली (उत्तरप्रदेश) ७२ किलो वजन गटात प्रथम नयना (हरियाणा), द्वितीय लीना राणी (दिल्ली), तृतीय सिमरन जीत कौर (पंजाब) ५५ किलो वजन गटात प्रथम राणी (मध्यप्रदेश), द्वितीय मनीषा (उत्तर प्रदेश), तृतीय अपरण प्रीत (पंजाब) ५० किलो वजन गटात प्रथम ज्योती (हरियाणा) व्दितीय प्रीती (हिमाचल प्रदेश) तृतीय कृषी (दिल्ली). ५९ किलो वजन गटात प्रथम क्रमांक पूजा (उत्तर प्रदेश), व्दितीय ममता (दिल्ली) तृतीय मनीषा (हरियाणा)५८ किलो वजन गटामत प्रथम सुमन (हरियाणा) व्दितीय रौनक (दिल्ली) तृतीय सुषमा (मध्यप्रदेश)६५ किलो वजन गटात प्रथम निशा (हरियाणा )व्दितिय जसप्रीत कौर (पंजाब) तृतीय मनाली (महाराष्ट्र). ६२ किलो वजन गटात प्रथम रेश्मा (महाराष्ट्र )व्दितिय अनिता (दिल्ली) तृतीय लवलीन कौर (पंजाब) ५७ किलो वजन गटात प्रथम पिंकी (हरियाणा)व्दितीय अंजू (चंदिगड) तृतीय शिवनारायणी आप्पा (केरळ) ५३ किलो वजन गटात प्रथम पूजा (दिल्ली) द्वितिय ममता (चंदीगड ) तृतीय पूजा (मध्यप्रदेश) अशाप्रकारे कुस्ती स्पर्धेमध्ये विजय प्राप्त केले.
दिवसभर सुरू असलेल्या महिलांच्या कुस्ती स्पर्धेमध्ये रेश्मा माने हिने सर्वांचे लक्ष वेधले आणि पहिल्या फेरीपासून आपल्या कुस्तीचा जलवा उपस्थितांना दाखवत समोरच्याला चितपट करून सुवर्ण कमाई केली. महाराष्ट्रामध्ये महिला कुस्तीपटू ची संख्या कमी असली तरी रेशमाने मात्र महिला कुठेही कमी नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. दरम्यान, यावेळी उत्तर भारतामधील महिला कुस्तीपटूंचा सहभाग लक्षणीय दिसून येत होता.
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष व उत्तर प्रदेश चे खासदार ब्रिजभूषण चरणसिंह, उपाध्यक्ष हरीश कदम, राज्य कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे, अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार, शिवछत्रपती पुरस्कार विजेते शरद पवार, राहता तालीम संघाचे अध्यक्ष रवींद्र वाघ ,शिवाजी राजे चौधरी , ज्ञानेश्वर मांगडे यांनी विजेत्या पैलवानांना योग्य पदक देऊन गौरव केला. रेश्मा माने हीने सुवर्णपदकाची कमाई करताच जय महाराष्ट्राच्या घोषणा कुस्ती आखाडा परिसरामध्ये घुमत होत्या. दुसऱ्या दिवशी कुस्ती स्पर्धांच्या संपूर्ण आयोजन आणि व्यवस्थापनासाठी राहता तालुकाव शिर्डी शहर आणि परिसरातल्या अनेक मान्यवरांनी विशेष परिश्रम घेऊन स्पर्धा यशस्वी करण्यास मदत केली.
राहता तालुका तालीम संघ यामध्ये प्रामुख्याने व्यवस्थापन कमिटीचे प्रमुख रवी वाघ, शिवाजी चौधरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन चौगुले, मदन मोकाटे, मच्छिंद्र वदक, देवा नालकर ,संदीप काचोळे, बाळासाहेब गोंदकर , अविनाश शिंदे, मोसिन सय्यद, आशिष पटेल, गोविंद सिनगर, निलेश गिधाड,योगेश निकम,आबिद शेख,संकेत गव्हाणे,राजू चौधरी,राजू पठाडे. किरण तुरकणे,अक्षय डांगे,विकास चौधरी आदिवासी मेहनत दिसून आले राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या या आखाड याला अनेक मान्यवरांनी भेट देऊन कुस्ती खेळाडू मनोबल वाढवले विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी विजेत्यांचे अभिनंदन करून मान्यवरांचा सन्मान केला. उद्या शेवटच्या दिवशी अंतिम कुस्त्यांचा आखाडा रंगणार आहे.
२३ वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा शिर्डी
शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2019 / फ्रीस्टाईल कुस्तीप्रकार / अंतिम निकाल.
५७ ककलो वजन गट
सुवर्णपदक – नवीन हरियाणा
रौप्यपदक-सुमित चंदिगढ
कांस्यपदक-आबा आटकळे महाराष्ट्र
कांस्यपदक-राहुल दिल्ली
६१ किलो वजन गट
सुवर्णपदक -रवींद्र SSCB
रौप्यपदक – सुरज कोकाटे महाराष्ट्र
कांस्यपदक – अनिलकुमार हरियाणा
कांस्यपदक – मनजीत चंदिगढ
६५ किलो वजन गट
सुवर्णपदक -श्रावण चंदिगढ
रौप्यपदक – सनी दिल्ली
कांस्यपदक – मुस्तकीन गोवा
कांस्यपदक – सिल्क हरियाणा
७० किलो वजन गट
सुवर्णपदक – नवीन SSCB
रौप्यपदक – विशाल कालिरामन हरियाणा
कांस्यपदक -सुनील हिमाचल प्रदेश
कांस्यपदक – नवीन झारखंड
७४ किलो वजन गट
सुवर्णपदक – गौरव उत्तरप्रदेश
रौप्यपदक – प्रीतम हरियाणा
कांस्यपदक – मुकुल मिश्रा
कांस्यपदक – विकास चंदिगढ
७९ किलो वजन गट/
सुवर्णपदक – वीरेंद्र गुलीया sscb
रौप्यपदक – सचिन गिरी उत्तरप्रदेश
कांस्यपदक – प्रित सिंग चंदिगढ
कांस्यपदक – पुनीत राठी हरियाणा
८६ किलो वजन गट
सुवर्णपदक – संजीत SSCB
रौप्यपदक – अजय तोमर SSCB
कांस्यपदक – मोनू राजस्थान
कांस्यपदक – विकास चंदिगढ
९२ किलो वजन गट
सुवर्णपदक – सिकंदर शेख महाराष्ट्र
रौप्यपदक – सुनील हरियाणा
कांस्यपदक – लव्हप्रिंत पंजाब
कांस्यपदक – सुनील चंदिगढ
९७ किलो वजन गट
सुवर्णपदक – आकाश दिल्ली
रौप्यपदक – अमित हरियाणा
कांस्यपदक – साहिल पंजाब
कांस्यपदक – मंदीप SSCB
१२५ किलो वजन गट
सुवर्णपदक – आर्यन प्रताप
रौप्यपदक – मोहित दिल्ली
कांस्यपदक – पुष्पेंदर SSCB
कांस्यपदक – प्रितपाल सिंग पंजाब
९२ किलो वजनी गटाची मात्र पैलवान विकी सोबत निवड चाचणी होणार आहे.सिकंदर शेख विरुध्द विकी अशी चाचणी होईल.विकी एशियन कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक विजेता असून जखमी असल्याने या स्पर्धेला हजर राहू शकणार नाही तसे पत्र त्याने अगोदरच फेडरेशन कडे दिल्याची माहिती मिळाली.