परिंचे- वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थानचे भक्तनिवास विलगीकरणासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे. सर्व सुविधा शासनामार्फत पुरविण्यात येणार आहेत. श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान हे पूर्णतः बंद आहे. देवस्थान कमिटीमार्फत मंदिर परिसरात स्वच्छता व फवारणी केल्याचे अध्यक्ष बाळासाहेब धुमाळ यांनी सागितले.वीर भक्तनिवास शीघ्र प्रतिसाद आपत्ती निवारण समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियोजन करण्यात आले.
गावात ग्रामपंचायत व श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान वीर यांच्या माधमातून फ्लेक्सद्वारे जनजागृती करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या वतीने सोडियम हायपो क्लोराइडची फवारणी करण्यात आल्याची माहिती सरपंच माऊली वचकल यांनी दिली. गावात बाहेरगावाहून आलेल्या सर्व कुटुंबांचे सर्वेक्षण आशासेविका यांच्या माध्यमातून करण्यात आले. बाहेरगावातून आलेल्या नागरिकांनी घरातच थांबणे बाबतच्या सूचना ग्रामविकास अधिकारी संजय म्हेत्रे यांनी दिल्या. बाहेरून आलेल्या कुटुंबांची आरोग्य तपासणी आरोग्य सेवक संतोष दुधाळ, अश्विनी हिरवे यांनी केली.