RBI | रिझर्व बॅंकेचे मवाळ पतधोरण; विकास दर वाढण्यासाठी व्याजदर जैसे थे

मुंबई – महागाई वाढण्याची शक्‍यता असूनही रिझर्व बॅंकेने जाहीर केलेल्या पतधोरणात व्याजदर वाढ टाळली आहे. बॅंकेच्या रेपो आणि रिव्हर्स रेपो दरात कसलाही बदल करण्यात आलेला नाही. त्याचबरोबर बॅंकेने आगामी काळात आवश्‍यक उपाययोजना करण्याची तयारी ठेवली आहे.

पतधोरण समितीच्या बैठकीनंतर रिझर्व बॅंकेचे गव्हर्नर शक्तीक दास यांनी सांगितले की, रिझर्व बॅंकेने विकास दर वाढविण्यास प्राधान्यक्रम देण्याचे ठरविले आहे. त्याचबरोबर या तिमाहीमध्ये रिझर्व बॅंक एक लाख कोटी रुपयांचे सरकारी रोखे खरेदी करणार आहे. लॉक डाऊनच्या काळामध्ये रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात 1.15 टक्‍क्‍यांनी कपात करून तो चार टक्‍क्‍यावर आणला होता.

तो सध्या त्याच पातळीवर कायम ठेवण्यात आला आहे. तर रिव्हर्स रेपो दर 3.35 टक्के या पातळीवर कायम ठेवण्यात आला आहे. महागाईचा दर वाढून पाच टक्‍क्‍यांच्या पुढे गेला आहे. तो पाच टक्‍क्‍याच्या कमी करण्यासाठी रिझर्व्ह बॅंक प्रयत्न करणार आहे. बऱ्याच शहरांमध्ये लॉक डाऊन सुरू करण्यात आले आहे. करोना आगामी काळात असे रूप धारण करतो याकडे रिझर्व बॅंकेचे लक्ष आहे.

सरलेल्या आर्थिक वर्षाचा विकास दर उणे 7.5% राहण्याची शक्‍यता रिझर्व बॅंकेने व्यक्त केली आहे. तर आगामी वर्षाचा विकास दर 10.5 टक्के होईल असे बॅंकेने म्हटले आहे. गेल्या वर्षी रिझर्व बॅंकेने भांडवल सुलभता पुरेशी राहील यासाठी काळजी घेतली आहे. आगामी काळातही भांडवलदार कमी पडणार नाही याची आम्ही काळजी घेऊ तसे दास यांनी सांगितले. गेल्या पाच पत धोरणामध्ये रिझर्व बॅंकेने व्याजदरात वाढ केलेली नाही.

महागाई रोखणार
गेल्या काही महिन्यांमध्ये किरकोळ आणि घाऊक महागाईचा दर वाढला आहे याची दखल पतधोरण समितीने घेतली आहे. आगामी काळामध्ये किरकोळ किमतीवर आधारित महागाईचा दर 4.4 टक्के ते 5.2 दोन टक्‍क्‍यादरम्यान ठेवण्याचा रिझर्व बॅंक प्रयत्न करणार आहे.

मागणी चार टक्‍क्‍यांच्या दरम्यान कायम ठेवण्याचा प्रयत्न करावा अशी सूचना केंद्र सरकारने रिझर्व्ह बॅंकेला केलेली आहे. क्रूेडचे दर कसे राहतात पाऊस किती पडतो यावर महागाईीची पुढील वाटचाल अवलंबून आहे.त्याकडे रिझर्व बॅंकेचे लक्ष राहील असे शक्तीकांत दास यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.