मुंबई – यंदाच्या आर्थिक वर्षातले पहिले तिमाही पतधोरण आज रिजर्व्ह बँकेने जाहीर केले आहे. सलग दुसऱ्या वेळी रिजर्व्ह बँकेने रेपो रेट कपात केला आहे. ०.२५ टक्क्यांनी ही कपात करण्यात आली असून, आता रेपो रेट ६.२५ वरून ६ वर आला आहे. त्यामुळे सामान्य जनतेसाठी कर्जावरील व्याज कमी होऊन, कर्जाचा हफ्ता कमी होणार आहे. तसेच नवीन कर्ज घेणाऱ्यांसाठी कर्जाचे दर कमी होतील.
मागील आर्थिक वर्षात फेब्रुवारी मध्ये रिजर्व्ह बँकेने रेपो रेट मध्ये ०.२५ टक्क्यांनी कपात केली होती. तसेच २०२० च्या आर्थिक वर्षात देशाचा विकासदर ७.२ टक्के राहण्याचा अंदाज आज रिजर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने वर्तविला आहे.
यांना होणार फायदा
घर तसेच वाहनांसाठी घेतलेल्या कर्जाच्या हफ्त्यांमध्ये कपात होणार. रेपो रेट मध्ये कपात झाल्याने नवीन कर्ज घेणाऱ्यांना स्वस्तात मिळेल.
रेपो रेट म्हणजे काय ?
सार्वजनिक बँका आपल्या कर्जाची मागणी पूर्ण करण्यासाठी रिजर्व्ह बँकेकडून पैसे घेते, त्या पैशांवर रिजर्व्ह बँकेकडून जो दार आकारला जातो त्यास रेपो रेट असे म्हणतात.