आरक्षणप्रश्‍नी धनगर समाज पुन्हा आक्रमक

आचारसंहितेपूर्वी आश्‍वासन पूर्ण करा अन्यथा आंदोलन : गोपीचंद पडळकर

पुणे – “धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण मिळावे, यासाठी समाजाचा लढा सुरू आहे. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये जी आश्‍वासने देण्यात आली होती, त्यापैकी काहीच पूर्ण करण्यात आली आहेत. मात्र आमचे अंतिम ध्येय “एसटी’चा जातीचा दाखला मिळणे आहे. राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी धनगर आरक्षणाचा प्रश्‍न सोडवून समाजाला एसटीचा जातीचा दाखला द्या, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल,’ असा इशारा धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.

पुण्यात मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पडळकर बोलत होते. “सरकारकडून जे मिळेल ते घ्यायचे आणि राहिलेल्यासाठी भांडायचे, हे धोरण समाजाने स्वीकारले आहे. आमच्या प्रमुख मागण्यांपैकी सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्‍लोक आहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्यात आले आहे. समाजाला “एसटी’चा जातीचा दाखला देण्यास तांत्रिक अडचणी असल्याचे राज्य सरकारचे म्हणणे आहे. “धनगर’ आणि “धनगड’ या दोन वेगळ्या जाती असल्याचे प्रतिज्ञापत्रक राज्य सरकारने उच्च न्यायालयात दाखल करावे, अशी आमची मागणी होती. त्याप्रमाणे सरकारने ते सादर केले आहे. मात्र यावर लवकर निर्णय होण्यासाठी मराठा आरक्षणाच्यावेळी जशा रोजच्यारोज न्यायालयाच्या तारखा घेऊन मार्ग काढला. तशाच प्रकारे धनगर आरक्षणाचा प्रश्‍न सोडवण्यासाठी सरकारने उच्च न्यायालयाच्या दररोज तारखा घ्याव्यात अशी पडळकर यांची मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)