मागासवर्गीय आयोगाची वाट न पाहता मराठा समाजाला आरक्षण द्या!- उद्धव ठाकरे

मुंबई: सरकारने मराठा समाजासोबत इतरही समाजाच्या मागण्यांचा एकत्रित विचार करावा. मराठा समाजाने आक्रमकता सोडून द्यावी, तसेच कुठेही हिंसाचार करु नये, असे आवाहन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनकर्त्यांना केले आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची वाट न बघता अधिवेशन बोलावण्याची आमची भूमिका आहे. आरक्षणाबाबात ज्या-ज्या समाजाच्या मागण्या आहेत, त्या सर्व मागण्यांचा एकत्रित विचार करुन त्याबाबत एकमातने निर्णय घ्यावा.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे, त्यासाठी शिवसेनेचे सर्व मंत्री आणि आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)