मराठा समाजाला आरक्षण देणं हा आमचा पॉलिटिकल अजेंडा नाही- चंद्रकांत पाटील

मुंबई: मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यात अपयशी झाल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पदावरून पायउतार होण्याची मागणी होत आहे. मात्र महसूल मंत्री चंद्रकांत पाटील मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभे राहत “गेल्या दोन वर्षांपासून मराठा समाजासाठी जे निर्णय घेतले ते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच, त्यामुळे अशा कर्तव्यदक्ष मुख्यमंत्र्यांना बदलण्याचं काही एक कारण नाही, असे स्पष्ट केले.

पाटील म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण देणं हा आमचा पॉलिटिकल अजेंडा नाही, तर ती समाजाप्रती केलेली कमिटमेंट आहे. त्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून आम्ही रात्रंदिवस काम करत आहोत. मुख्यमंत्री समाजातील प्रत्येक घटकाला आपला समजून न्याय देत आहेत. महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेचे ते मुख्यमंत्री आहेत. त्यांनी कधीही कोणत्याही समाजाबद्दल दुजाभाव केला नाही.”

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मराठा समाज बांधवांनी हिंसात्मक आंदोलन न करता, चर्चा करुन, त्याद्वारे समाजातील लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत, असे आवाहन देखील चंद्रकात पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)