आरक्षण आपल्या हक्काचे आहे, त्यासाठी निर्णायक लढा देऊ – धनंजय मुंडे

परळी: आरक्षण आपल्या हक्काचे आहे, त्यासाठी निर्णायक लढा देऊ मी तुमच्या खांद्याला खांदा देऊन लढेल, असा शब्द राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मराठा आरक्षणासाठी ठिय्या आंदोलनाला बसलेल्या कार्यकर्त्यांना दिला. तसेच आंदोलन शांततेच्या मार्गाने करावे, असे आवाहन केले.

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आरक्षण व इतर मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन सुरु आहेत. दरम्यान, कार्यकर्त्यांनी राज्यात मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात बंदची हाक दिली होती. त्यामुळे या मोर्च्याने हिंसक वळण घेतले होते. अखेर आज दुपारी अडीचच्या सुमारास बंद मागे घेण्यात आल्याचं मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांनी जाहीर केलं.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/dhananjay_munde/status/1022050094462324736

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)