कोरोना विषाणूंच्या धोक्‍यात भारत जगात 23व्या स्थानी

लंडन : कोरोना विषाणूंचा जगभराला असणारा धोका संशोधकांनी शोधला आहे. त्यात सर्वाधिक धोका थायलंडला असून त्या पाठोपाठ अनुक्रमे जपान आणि हॉंगकॉंग यांचा क्रमांक लागतो. अमेरिका धोक्‍याच्या सहाव्या स्थानी असून भारताचा क्रमांक 23वा आहे. ऑस्ट्रेलिया 10 व्या तर इंग्लंड 17व्या स्थानी आहे.

साउथॅम्पटन विद्यापीटाच्या समशोधकांनी ही मांडणी केली आहे. चीनमध्ये पसरलेल्या साथीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. चीनच्या कोरोना बाधीत भागात केलेल्या प्रवासबंदीच्या परिणामांचा आम्ही अभ्यास करत आहोत. तसेच चीनच्या ल्युनर नव वर्षाची दोन फेब्रुवारीला सुटी संपल्यानंतर होणाऱ्या परिणामांकडेही आम्ही लक्ष ठेऊन आहोत,असे इंग्लंडमधीलम साउथॅम्पटन विद्यापीठाचे संशोधक शेंग्जीया लाय यांनी सांगितले.

जगाला असणार धोका हा चीन मधून परतणाऱ्या प्रवाशांच्या संख्येवरून काढला आहे. शहरांमध्ये सर्वाधिक धोका हॉंगकॉंगला असून त्यापाठोपाठ तैपाई (तैवान), सीडनी (12), न्युयॉर्क (16) आणि लंडन (19) यांचा समावेश जगातील महत्वाच्या 30 आंतर राष्ट्रीय शहरात आहे.

ऍनोनाइज्ड मोबाईल डाटा, आयपी ऍड्रेस, आंतर राष्ट्रीय हवाई प्रवास डाटा यांचा वापर करून चीनमधून येणाऱ्या लोकांची माहिती घेऊन हा अहवाल बनवण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.