पुणे, – परिसंस्था मधील विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा आणि वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेमधील संशोधन मार्गदर्शकांसाठी कोथरुड येथील एम.ई.एस. वरिष्ठ महाविद्यालयात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी पुणे शहरातील संलग्नित महाविद्यालयांतील मार्गदर्शक यात सहभागी होते. पहिल्या सत्रात विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेमधील संशोधन मार्गदर्शकांना विद्यापीठाचे मा. प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, प्रा. डॉ. प्रमोद पाटील, तज्ज्ञ मार्गदर्शक प्रा. डॉ. पंडित विद्यासागर यांनी मार्गदर्शन केले.
दुसऱ्या सत्रामध्ये वाणिज्य व्यवस्थापन विद्याशाखेतील संशोधन मार्गदर्शकांना वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. यशोधन मिठारे व प्रा. डॉ. शैलेश कासांडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेस व्यवस्थापन परिषद सदस्य बागेश्री मंठाळकर व प्रा. डॉ. नितीन घोरपडे उपस्थित होते.