निवडणुकीच्या कामातून शिक्षकांची सुटका 

– 50 हजार शिक्षकांना दिलासा 

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या 50 हजार शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या शिक्षकांची निवडणुकींच्या कामातून सुटका करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने तसे परिपत्रक काढून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.

राज्यात सध्या दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. परीक्षांनंतर पेपरतपासणीचे कामही शिक्षकांना देण्यात येते. त्याचसोबत होणा-या लोकसभा निवडणुकांचेही काम या शिक्षकांना देण्यात येणार होते. त्यामुळे विविध शिक्षकसंघटनांनी दहावी-बारावीच्या परीक्षांमधील शिक्षकांची व्यस्तता लक्षात घेता शिक्षकांना निवडणुकांचे काम देण्यात येउ नये अशी विनंती निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानुसार निवडणूक आयोगाचे उपसचिव आणि सहमुख्य निवडणूक अधिकारी अ.ना.वळवी यांनी परिपत्रक काढून या शिक्षकांना निवडणूक कामातून सूट देण्यात यावी असे परिपत्रक काढले आहे. हे परिपत्रक सर्व जिल्हाधिका-यांना पाठविण्यात आले आहे. यामुळे सुमारे 50 हजार शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)