मद्रिद – आफ्रिकेतून सागरी मार्गांने कॅनबेरा बेटांकडे जाणाऱ्या निर्वासितांपैकी 140 निर्वासितांना स्पेनच्या बचाव पथकाने वाचवले आहे. स्पेनच्या अधिकाऱ्यांनी आज ही माहिती दिली. बचाव पथकाने एकूण 90 निर्वासितांना वाचवले आहे.
त्यातील 47 जण आफ्रिकेतील सहारा जवळच्या भागातील तर 43 जण उत्तर आफ्रिकेतील आहेत, असे कॅनबेरा बेटांच्या आपत्कालिन सेवा विभागाने म्हटले आहे. ग्रॅन कॅनरिया जवळ दोन बोटींचा पाठलाग करून या सर्वांना वाचवण्यात आले आहे. उर्वरित 55 निर्वासितांना फुएरतेनवेंतुराजवळच्या बेटाजवळच्या एका बोटीतून सोडवण्यात आले.
फुएरतेनवेंतुरा आणि ग्रॅन कॅनबेरा ही बेटे आटलांटिक समुद्रात असलेल्या स्पेनच्या कॅनरी आयलंडस या द्विपसुहाशी संबंधित आहेत. ही बेटे मोरोक्कोपासून केवळ 100 किलोमीटर अंतरावर आहेत. स्पेनमध्ये यावर्षी 30 सप्टेंबर पर्यंत 13,118 निर्वासित आले आहेत.
गेल्यावर्षी याच कालावधीमध्ये जेवढे निर्वासित आले होते, त्यापेक्षा या वर्षीची निर्वासितांची संख्या दुपटीने जास्त आहे, असे स्पेनच्या गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.