नगर – शहरातील मुकुंदनगर परिसरातील सीआयव्ही कॉलनी मागे शरद मुथ्था यांच्या शेतात व नागरदेवळे येथील प्रितम हॉटेल मागे बाबा शेख यांच्या शेतात गोवंश जातीचे जनावरे बकरी ईद निमित्त कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या 41 जनावरांची सुटका भिंगार कॅंम्प पोलिसांनी केली आहे.
आरोपी वसीम मुल्ला, सादिक अल्लाबक्ष, अल्कमश चॉद शेख (सर्व रा. मुकुंदनगर) तर नागरदेवळे येथील छाप्यात इल्लुभाई कुरेशी, (त्यांचा भाऊ पुर्ण नांव माहित नाही) (दोघे रा. नागरदेवळे, भिंगार, नगर) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. नगर उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांना मिळालेल्या माहितीनुसार मुकुंदनगर परिसरात ईद निमित्त कत्तलीसाठी काही जनावरे बांधून ठेवली असल्याची खात्रीशिर माहिती मिळाली. त्यानुसार भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांच्या पथकाने दोन वेगवेगळ्या ठिकानी छापा टाकून 41 गोवंश जातीचे जनावरांची सुटका केली आहे.