Wayanad- वायनाडमध्ये जिल्ह्यात निसर्गाचा रुद्रावतार बघायला मिळाला. 4 गावं होत्याची नव्हती झाली. २00 हून अधिक लोकांचा बळी गेला असून मृत्युने थैमान घातले असताना अनेक रोमहर्षक घटना समोर येत आहे. वायनाड येथे मदत पथकातल्या जवानांनी जीव पणाला लावून घनदाट जंगलात एका गुहेमध्ये आसरा घेतलेल्या चार चिमुकलांची सुखरूप सुटका केली आहे. या कामगिरीमुळे जवानांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कालेपट्टा रेंजच्या जंगलात एक महिला या मुलांना अन्नपाणी मिळावे म्हणून भटकत असल्याचे नजरेला पडले. तिची विचारपूस केल्यानंतर त्या महिलेने जवानांना गुहेमधील आपली चार मुले दाखवली. ही मुले 1 ते 4 वर्षे वयाची आहेत. 8 तासांच्या विशेष मोहिमेनंतर ही आदिवासी मुले आणि त्यांच्या आईला सुरक्षित स्थळी आणण्यात आले.
वायनाडच्या पानिया समुदायातील हे कुटुंब डोंगरमाथ्यावरील एका गुहेत अडकले होते. त्या गुहेच्यावर खोल दरी होती आणि तिथे पोहोचण्यासाठी टीमला साडेचार तासांपेक्षा जास्त वेळ लागला. पीटीआयशी बोलताना हशीस यांनी सांगितले की, गुरुवारी आई आणि चार वर्षांच्या मुलाला वनक्षेत्राजवळ भटकताना पाहिले. मायलेकरांची चौकशी केल्यावर कळाले की इतर तीन मुले आणि त्यांचे वडील अन्नाविना गुहेत अडकले आहेत.
हशीस म्हणाले, गुहेत अडकलेले हे कुटुंब आदिवासी समाजातील एका विशेष वर्गाशी संबंध ठेवतो. सहसा या समाजातील इतर लोकांशी संवाद टाळतात. ते सामान्यतः वनातील उत्पदनांवर अवलंबून असतात. शेतातील तांदूळ स्थानिक बाजारपेठेत विकून आपला उदरनिर्वाह करतात. मात्र मुसळधार पाऊस आणि भूसख्लनामुळे बाहेर पडता न आल्याने अनेक दिवसापासून उपाशी होते.
गुहेजवळ गेल्यानंतर जवानांनी काय पाहिले?
हशीस म्हणाले, ज्यावेळी आम्ही मोठ्या अथक प्रयत्नांनतर गुहेजवळ पोहचलो त्यावेळी आम्ही पाहिले की मुले थकली होती. आम्ही आमच्याबरोबर जे काही अन्नपदार्थ घेतले होते ते आम्ही त्यांना दिले. नंतर खूप समजावून सांगितल्यावर, त्यांच्या वडिलांनी आमच्यासोबत यायला तयार केले. आम्ही मुलांना आमच्या अंगावर पट्टा बांधला आणि परतीचा प्रवास सुरू केला.