सुपे (पुणे जिल्हा) – गाय आणि वासरे (Cows and calves) कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्यांना सुपे पोलीसांनी (supe police station) अटक केली आहे. राजू हुसेन शेख, अमर हजी शेख, हुसेन इमाम शेख (तिघेही रा. निरावागज, ता. बारामती), कौसीन जमील कुरेशी, आऱिफ राजू कुरेशी (दोघे रा. करमाळा), मोहम्मद गुलाब तांबोळी (रा. लोणी भापकर) अशा सहा जणांना पोलीसांनी अटक केली (6 people arrested) असून त्यांच्यावर प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत (Animal Protection Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बैलपोळ्याच्या दिवशी गुरुवार (दि. 14) सुपा पोलीस स्टेशनचे नाईक डी.डी. धुमाळ, अंमलदार के.व्ही. तागडे हे रात्री गस्त घालत असताना त्यांना कऱ्हा नदी पुलाजवळ दोन संशयित पिकअप उभ्या असल्याचे दिसले. त्यांनी पाहणी केली असता त्यामध्ये 45 जर्सी गाय व वासरे असल्याचे आढळले. अधिक चौकशी केली असता ही जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे आरोपींनी सांगितले. तर आणखी काही जनावरे लोणी भापकर येथील मोहम्मद गुलाब तांबोळी यांच्या गोठ्यात डांबून ठेवल्याची माहिती मिळाली.
सदर माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांना देण्यात आली. त्यानंतर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे रात्र गस्तीवरील पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कन्हेरे व त्यांच्या टीमशी संपर्क साधून लोणी भापकर येथे छापा टाकण्यात आला. यावेळी 14 गायी व कालवड यांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी सहा जणांना प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल , अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांचा मार्गदर्शनाखाली सुपे पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक नागनाथ पाटील, उपनिरीक्षक पांडुरंग कन्हेरे, सहाय्यक फौजदार जाधव, वाघोले, साळुंखे, पोलीस नाईक धुमाळ, जविर, ताडगे, दरेकर यांनी केली.