मतदान केंद्रांवरील आवश्‍यक सुविधा (भाग-२)

निवडणूक आयोग यांनी त्यांच्याकडील पत्र क्रमांक 464/INST/2019/EPS दिनांक 16.3.2019 अन्वये मतदानाच्यां वेळी प्रत्येक मतदान केंद्रांवर आश्वासित किमान सुविधा Assured minimum facilities (MF) पुरविण्याचे निर्देश दिले आहेत. प्रत्येकी मतदान केंद्रांवर त्याप्रमाणे सुविधा उपलब्ध करून देणे आवश्‍यक आहे.

मतदान केंद्रांवरील आवश्‍यक सुविधा (भाग-१)

7. योग्य संकेत फलक – प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांच्या मार्गदर्शनासाठी, स्थानाचे लेआऊट, उपलब्ध असलेल्या सुविधा याचे फलक लावण्यात यावे. (जसे रॅम्प, शौचालय, पिण्याचे पाणी आणि मदत कक्ष).

8. शौचालय – पुरुष व महिला मतदारांसाठी वेगळे स्वतंत्र शौचालय असावे. दोन स्वतंत्र शौचालय उपलब्ध नसल्यास, उपलब्ध असलेले पक्के शौचालय महिला मतदारांकरिता राखीव ठेवण्यात यावे आणि पुरुष मतदारांसाठी एक तात्पुरते शौचालय पुरविण्यात यावे. संपूर्ण दिवस शौचालय स्वच्छ ठेवण्यासाठी एक कर्मचारी किंवा रोजंदारीवर कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात यावी.

9. मतदान केंद्रात सावली – प्रत्येक मतदान केंद्रात 15 द 15 चौ. फूट आकाराच्या सावलीची (व्यवस्था महिला, ज्येष्ठ नागरिक / मुलांसह आलेले मतदार यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात यावी.

10. स्वयंसेवक – मतदारांची रांग व्यवस्थापित करण्यासाठी एन.सी.सी. / एन.एस.एस. / स्काऊट यांच्या स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात यावी. पीडब्ल्यूडी (शारीरिकदृष्ट्या निसमर्थ व्यक्ती) मतदारांना मतदान केंद्रात पोहोचविण्यासाठी स्वयंसेवकांनी मदत आणि मार्गदर्शन करणे आवश्‍यक असेल.

हे स्वयंसेवक शारीरिकदृष्ट्या निसमर्थ मतदारांना मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारापर्यंत जाण्यास मदत करतील. मतदान केंद्राच्या आत त्यांना मतदान कर्मचाऱ्याद्वारे मदत केली जाईल. या स्वयंसेवकांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असावे. मतदानाच्या दिवशी, मतदान केंद्रावर नियुक्त असणाऱ्या स्वयंसेवकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात यावी. स्वयंसेवकांसाठी मुख्य निवडणूक अधिकारी तपशीलवार ‘काय करावे-काय करू नये’ याचे मार्गदर्शन तयार करतील.

11. भोजन व्यवस्था – मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रामध्ये काम करणाऱ्या स्वयंसेवकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात यावी.

12. मुलांसाठी पाळणाघराची तरतूद – मतदाराच्या बरोबर असलेल्या मुलांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर पाळणाघराची योग्य व्यवस्था असणे आवश्‍यक आहे. या मुलांची काळजी घेण्यासाठी एक प्रशिक्षित कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात यावी.

13. वाहतूक सुविधेसाठी तरतूद – दृष्टिदोष, अंधत्व, स्नायू व हाडांच्या किंवा चेतासंस्थेच्या व्याधीने ग्रस्त, अशक्त मतदारांसाठी सार्वजनिक वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. जर सार्वजनिक वाहतूक उपलब्ध नसेल तर खासगी वाहनांना भाडेतत्त्वावर या कामासाठी घेण्यात यावे.

14. रांगेचे व्यवस्थापन – मतदान केंद्रामध्ये तीन रांगा असतील: एक रांग पुरुष मतदारांसाठी, दुसरी रांग महिला मतदारांसाठी आणि तिसरी रांग ज्येष्ठ नागरिक आणि शारीरिकदृष्ट्या निसमर्थ मतदारांसाठी.

सध्याच्या सरावानुसार, दोन महिला मतदारांचे मतदान झाल्यानंतर एका पुरुष मतदाराला मतदान करण्यायची परवानगी देण्यात यावी. ज्येष्ठ नागरिक आणि शारीरिकदृष्या निसमर्थ मतदारांना मतदान करण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)