वाघोली : वाघोली येथील पुणे नगर महामार्गवरील साचलेली माती, रोड स्वीपिंग, मशीन व हाय प्रेशर वॉशिंग ट्रकद्वारे काढण्याबाबत आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे वाहतूक नियंत्रण समितीचे मुख्य कार्यवाहक संपत आबा गाडे यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
यावेळी मुख्य कार्यवाहक संपत आबा गाडे यांनी सांगितले की, वाघोली येथील पुणे नगर महामार्गावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये माती, दररोज साचत आहे. त्यामुळे सदर रस्त्यावरून दररोज ये- जा करत असलेल्या मोटरसायकलवर, व इतर वाहनामध्ये प्रवास करणाऱ्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये शारीरिक, मानसिक, आरोग्यास, हानी पोहोचत आहे.
तसेच अपघाताचे प्रमाण देखील वाढले असून सदर अपघातामध्ये अनेक निष्पाप लोकांचे बळी गेलेले आहेत. त्यामुळे वाघोली शहरातून दररोज प्रवास करणाऱ्या लोकांना स्वतःचा जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पुणे नगर महामार्गावरील वाघोली येथे रोडवरील साचत असलेली माती, काढण्याकरिता पुणे महानगरपालिकेकडे स्वीपिंग, मशीन उपलब्ध आहे. परंतु सदरची मशीन वाघोली येथे आजपर्यंत आलेली नाही.
त्यामुळे सदर स्वीपिंग, मशीनची वाघोली साठी अत्यंत गरजेचे आहे. परंतु सदरचे स्वीपिंग मशीन आपल्या वाघोली साठी उपलब्ध होत नाही. तसेच वाघोली येथे रोडवरील दररोज साचत असलेली माती, काढण्याकरिता आपण शिरूर, हवेली (वाघोली) मतदार संघाकरिता स्वतंत्र नवीन स्वीपिंग, मशीन, उपलब्ध करून दिल्यास अनेक लोकांचे जीव, वाचतील. तसेच जीवन निरोगी, होण्यास देखील मदत होईल. तसेच अनेक लोकांचे होणारे अपघात कमी होण्यास नक्कीच फायदा होईल. अशी मागणी गाडे यांनी केली आहे.