#RepublicDay2019 : राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा

भारतीय राष्ट्रध्वजाचे रंगांचे महत्व :

प्रत्येक देशासाठी त्या देशाचा राष्ट्रधव्ज अतिश महत्वचा असतो. देशातील असंख्य (करोडो) नागरिकांच्या भावना आणि प्रेम त्या राष्ट्रध्वजाशी जोडल्या गेलेल्या असतात. देशाचा राष्ट्रधव्ज हा राष्ट्राची एकता दर्शवण्याचे काम करत असतो.आपल्या सर्वांनाच माहित आहे. कि भारताच्या राष्ट्रधव्जामध्ये तीन वेगळ्या प्रकारचे रंग असून,त्या प्रत्येक रंगाचे आपले एक वेगळे महत्व आहे. तसेच  राष्ट्रध्वजाचा मान राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून प्रजासत्ताक दिनी प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापरावर शासनाने बंदी घातली आहे, राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा तसेच त्याचा अवमान होऊ नये यासाठी दक्षता घेणे महत्वाचे आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राष्ट्रीय अवमान प्रतिबंध कायदा 1971 कलम 2 नुसार कारवाई करण्यात येते. काहीवेळा समारंभात वैयक्तिक वापरण्यात येणारे राष्ट्रध्वज रस्त्याच्या कडेला किंवा इतर ठिकाणी पडलेले, विखुरलेले आढळतात.हे दृश्‍य राष्ट्र प्रतिष्ठेला शोभणारे नसल्याने राष्ट्रध्वजाच्या वापरानंतर एकतर त्याचा योग्यमान राहील याप्रमाणे ठेवण्यात यावेत.

अन्यथा जर राष्ट्रध्वज खराब झालेले असतील तर त्याचा योग्य तो मान राखुन ते ध्वजसंहितेतील तरतुदीनुसार नष्ट करावेत. अशा प्रसंगी असे रस्त्यात पडलेले, विखुरलेले राष्ट्रध्वज जर प्लॅस्टिकचे असतील तर प्लॅस्टिकबरेच दिवस नष्ट होत नसल्याने असे ध्वज बरेच दिवस त्या ठिकाणी दिसतात.

केसरी रंग – राष्ट्रधव्जामधील सर्वात पहिला ‘केसरी’ असून,हा रंग बलिदान, त्याग आणि शक्ती यांचे प्रतीक मानले जाते. हा रंग देशाप्रती असणारे बलिदान आणि शक्ती यांना दर्शवितो.

सफेद रंग –  हा रंग राष्ट्रधव्जाच्या मध्यभागी दिसून येतो. सफेद रंग देशातील शांती, स्वछता, सुख आणि खरेपणा (ईमानदारी) चा संदेश देतो. हा रंग स्वछता, शांती आणि बुद्धिमतेचे प्रतीक मानले जाते.

हिरवा रंग – हा रंग सर्वात शेवटी असून,देशाच्या समृद्धीचे प्रतीक आहे. विश्वास, आनंद, समृद्धी, प्रगती, बुद्धिमत्ता यांचे सुद्धा प्रतीक म्हणून हिरवा रंग मानला जातो.

अशोक चक्र – राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी ‘अशोक चक्र’ दिसुन येते. मौर्य शासक सम्राट अशोक च्या सारनाथ स्तंभावरून हे चक्र घेण्यात आले आहे.यामध्ये जीवन आणि मृत्यू यांचा जीवन क्रम दर्शण्यात आला आहे.

-ऋषिकेश जंगम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)