#RepublicDay2019 : मेढ्याचे सुपुत्र सहाय्यक फौजदार विजय देशपांडे यांना राष्ट्रपती पदक

मेढा – मेढा (ता. जावळी) चे सुपुत्र आणि कराड येथे सहाय्यक फौजदार पदावर कार्यरत असणाऱ्या विजय उर्फ पुरुषोत्तम देशपांडे यांना पोलिस दलात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपती पदकाने गौरविण्यात येणार आहे.
सहाय्यक फौजदार पुरुषोत्तम देशपांडे गेली 35 वर्षे पोलिस दलात मेढा, वाई, फलटण येथे प्रामाणिक सेवा बजावली. ते सध्या कराड येथे सहाय्यक फौजदार या पदावर आपला कार्यभार सांभाळत आहेत. मे 2018 मध्ये पालकमंत्र्याच्या हस्ते झालेल्या पोलिस महासंचालक सन्मान पदकाचेही ते मानकरी ठरले होते.

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर पुरुषोत्तम देशपांडे यांना भारत सरकारकडून राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर करण्यात आले आहे. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते त्यांना राष्ट्रपती पदक बहाल करण्यात येईल. विजय उर्फ पुरुषोत्तम देशपांडे यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल मेढा ग्रामस्थ, कराडचे उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड आदींनी अभिनंदन केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)