Republic Day Parade 2021 – राजपथावर झालेले प्रजासत्ताक दिन परेड यावेळी अनेक कारणांनी विशेष ठरले आहे. यंदा प्रथमच प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये राफेल विमानांनी उड्डण घेतले. यावेळी भारताच्या पहिल्या महिला लढाऊ विमान पायलट भावना कांत यांनी सलामी दिली.
प्रजासत्ताक दिनी हवाई दलाचे प्रदर्शन करण्यात आले. प्रदर्शानात हवाई दलाचे हेलीकाॅप्टर आणि विमानाबरोबरच रडार रोहिणीची प्रतिकृती तयार केली गेली. प्रदर्शनाच्या दोन्ही बाजूला हवाई दलाचे अधिकारी तैनात असल्याचे दाखवण्यात आले. प्रदर्शनात देशातील लढाऊ पायलट भावना कांत यांनी सलामी दिली.
भावना कांत तीसऱ्या महिला आहेत ज्यांना फायटर लढाऊ विमान उड्डाणासाठी हवाई दलाकडून नियुक्त करण्यात आले. तसेच प्रजासत्ताक दिन परेडमध्ये सहभागी होणाऱ्या त्या देशातील पहिल्या महिला लढाऊ पायलट बनल्या आहेत.