नवी दिल्ली – भारत आज ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथ परेड होणार आहे. कर्तव्य पथ पूर्वी राजपथ म्हणून ओळखला जात असे. आजच्या कार्यक्रमासाठी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल फतेह अल-सिसी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.पंतप्रधान मोदी आज देशाला कोणता नवीन संदेश देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पंतप्रधान मोदींनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि इजिप्तचे राष्ट्रपती अब्दुल फतेह अल-सिसी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राष्ट्रपती भवनातून कर्तव्य पथकडे रवाना झाले.
#WATCH दिल्ली: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने 74वें गणतंत्र दिवस के अवसर पर राष्ट्रीय युद्ध स्मारक पर श्रद्धांजलि दी। #RepublicDay pic.twitter.com/BMLeD9ENau
— ANI_HindiNews (@AHindinews) January 26, 2023
अशी असेल परेड
परेडमध्ये एकूण आठ लष्करी तुकड्या असतील. लष्कराच्या बाजूने कूच करणार्या तुकड्यांमध्ये मेकॅनाइज्ड इन्फंट्री, डोग्रा रेजिमेंट, पंजाब रेजिमेंट, मराठा लाईट इन्फंट्री, बिहार रेजिमेंट आणि गोरखा ब्रिगेड यांचा समावेश आहे. हवाई दल आणि नौदलाचे प्रत्येकी एक पथक असेल. परेडमध्ये बीएसएफचा कॅमल बँड देखील दिसणार आहे.
राफेल, सुखोईसह 50 लढाऊ विमाने आकाशात स्टंट करणार आहेत. 23 लढाऊ विमाने, 18 हेलिकॉप्टर, आठ लष्करी वाहतूक विमानांचा समावेश आहे. नौदलाचे सर्वात जुने टोही विमान IL 38 पहिल्यांदाच आपले कर्तब दाखवणार आहे. प्रजासत्ताक दिनी सकाळी 10.30 वाजता परेड सुरू होईल. दीड तासाच्या या परेडमध्ये 50 लढाऊ विमाने ताकदीनिशी भरारी घेतील.