#Republic Day 2020 : बर्फाळ शिखरांवर जवानांनी फडकवला तिरंगा

नवी दिल्ली – देशभरात आज 71 वा प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आहे. यानिमित्त राजधानी दिल्लीतील दरवर्षीप्रमाणे राजपथावर मोठ्या संचलनाच आयोजन करण्यात आले आहे. या संचलनाच्यानिमित्ताने देशाच्या लष्करी सामर्थ्याचे, सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडत असते.

दरम्यान, बर्फाच्छादित प्रदेशांमध्ये देशाचं संरक्षण करणारे भारतीय जवानही यात मागे राहिले नाहीत. लडाखमध्ये उणे 20 अंश सेल्शिअस इतक्या तापमानात, रक्त गोठवणाऱ्या थंडीमध्ये जवानांनी ध्वजारोहण केलं आहे.

लडाखमध्ये 17000 फूट उंचीवर आयटीबीपी अर्थात इंडो तिबेटन पोलीसांच्या तुकडीतील जवानांनी रविवारी सकाळी मोठ्या उत्साहात ध्वजारोहण केलं. यावेळी हिमवीर म्हणून सैन्यदलात ओळखल्या जाणाऱ्या या तुकडीने ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’च्या घोषणा देखील दिल्या.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here