सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील १५० जणांचे करोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर विविध विलगीकरण कक्षात ७७ जणांना दाखल करण्यात आले आहे.
सातारच्या क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील ५०, कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील ७७, कृष्णा मेडिकल कॉलेजमधील २ , वाईच्याग्रामीण रुग्णालयातील ७, फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील १५ असे एकूण १५० जणांचे अहवाल निगेटिवह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
दि.१३ मे रोजी रात्री उशिरा क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात ८, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात ६९ असे एकूण ७७ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली.