सातारा (प्रतिनिधी) – सातारा जिल्हा रुग्णालय व कराडच्या कृष्णा मेडिकल हॉस्पिटलमधील ६४ संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णाच्या निकट सहवासातील तसेच श्वसन संस्थेच्या जंतुसंसर्गामुळे अशा विविध आजारांमुळे ६४ संशयित रुणांना विलगिकरण कक्षात दाखल करण्यात आले होते.
या ६४ रुग्णांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या सर्व ६४ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
यामध्ये सातारा जिल्हा रुग्णालयातील १२ पुरुष व ८ महिलांचा तर कृष्णा मेडिकल हॉस्पिटलमधील १६ महिला व ७ महिन्यांच्या बालिकेचा आणि २७ पुरुषांचा समावेश आहे.