नवी दिल्ली – भारतातील आर्थिक विषमता सध्या 1950 च्या पातळीवर आहे. 2023 मध्ये यामध्ये काही प्रमाणात सुधारणा झाली असली तरी एकूण आकडेवारी चिंताजनक आहे, असे एका अभ्यास अहवालात नमूद करण्यात आले आहे. पीपल रिसर्च ऑन इंडियाज कंन्झ्युमर इकॉनॉमीने यासंदर्भात एक शोधनिबंध प्रकाशित केला आहे. नागरिकांच्या उत्पन्नातील असमानता मोजण्यासाठी गिनी कोईफिशन्ट वापरला जातो.
आकडेवारीचे विश्लेषण केले असता भारतातील गिनी कोईफिशन्ट 1955 मध्ये 0.371 या अंकावर होता. 2023 मध्ये हा निर्देशांक 0.410 अंकावर गेला होता. हा निर्देशांक कमी असल्यानंतर असमानता कमी असल्याचे समजले जात असते. करोनानंतर भारतात उत्पन्नात मोठ्या प्रमाणात फरक पडला होता. त्यामुळे हा निर्देशांक 2021 मध्ये वाढून 0.528 अंकापर्यंत गेला होता.
गिनी कोईफिशन्ट जर शून्य असेल तर संबंधित देशात शून्य असमानता असल्याचे समजले जाते. तर हा कोईफिशन्ट एक असेल तर त्या ठिकाणी सर्वात जास्त असमानता असल्याचे समजले जाते. सध्या भारतामध्ये हा निर्देशांक 0.410 अंकावर आहे. या निर्देशांकाचे मार्गाक्रमण शून्याकडे जाण्याची गरज असते.
सध्या भारतात असलेली असमानता 1955 च्या पातळीवर आहे. म्हणजे स्वतंत्र्यानंतर सर्व नागरिकांच्या उत्पन्नात समानता आणण्यासाठी पुरेशे प्रयत्न करण्यात आलेले नाहीत, किंवा जे प्रयत्न केलेले आहेत ते चुकीच्या दिशेने केले आहेत असा याचा अर्थ होतो. सध्या भारतामध्ये श्रीमंतांची संख्या कमी असली तरी श्रीमंती वाढत आहे. तर गरिबांची गरिबी वाढत असल्याचा प्रकार घडत आहे.
सर्वात कमी उत्पन्न असलेल्या दहा टक्के लोकांना मदतीची प्रचंड गरज आहे. त्यामुळेच या लोकांसाठी मोफत अन्नधान्य योजना सुरू करण्यात आलेली आहे. गरीब महिलासाठी काही राज्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. एकीकडे अशा प्रकारचा वायफळ खर्च केला जात असल्याचे समजले जात असतानाच आर्थिक समानतेसाठी अशा प्रकारची योजना गरजेचे असल्याचे याकडेवारीवरून दिसून येते. ग्रामीण भागातील विषमता दूर करण्यासाठी शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधाकडे लक्ष देण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील गरिबांचे उत्पन्न 1955 पासून आतापर्यंत कमी झाले आहे. तर याच कालावधीत इतर भागातील लोकांच्या उत्पन्नात काही प्रमाणात वाढ झाली आहे.
ग्रामीण भागात विषमता जास्त –
ग्रामीण भागातील गिनी कोईफिशन्ट 1955 मध्ये 0.341 होता. तो 2023 मध्ये 0.405 झाला आहे. म्हणजे या कालावधीत ग्रामीण भागातील आर्थिक विषमता वाढली आहे. शहरी भागात 1955 मध्ये गिनी कोईफिशन्ट 0.392 होता. तो 2023 मध्ये 0.382 झाला आहे म्हणजे. यामध्ये घट झाली आहे. याचा अर्थ शहरातील विषमता या कालावधीत काही प्रमाणात कमी झाली. तर ग्रामीण भागातील आर्थिक विषमता या कालावधीत वाढलीे आहे.