पक्ष्याचा मृत्यू झाल्यास त्वरित कळवा; पुणेकरांसाठी टोल-फ्री क्रमांक

पुणे – बर्ड फ्लू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, शहरात पक्ष्याचा मृत्यू झाल्यास किंवा पक्षी मृतावस्थेत आढळल्यास तातडीने महापालिकेच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेचे आरोग्य विभागप्रमुख डॉ. आशीष भारती यांनी केले आहे.

 

 

राज्यात काही ठिकाणी बर्ड फ्लूमुळे कोंबड्या आणि पक्ष्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्याने चिंता वाढल्या आहेत. शहरात मात्र, अद्याप बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळलेला नाही. मात्र, खबरदारी म्हणून महापालिका आणि पशुसंवर्धन विभागाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. त्या अंतर्गत आरोग्य प्रमुखांनी विविध सूचना प्रसारित केल्या आहेत.

 

 

टोल फ्री क्रमांक – 1800-103-0222

शहरात पक्ष्यांचा मृत्यू झाल्याच्या तक्रारी हेल्पलाइनवर आल्यानंतर संबंधित सहायक आयुक्त कार्यालयातील आरोग्य निरीक्षकांना कळवण्यात येणार आहे. त्यानंतर आरोग्य निरीक्षक मृत पक्ष्यांचे नमुने पशुसंवर्धन विभागाच्या औंध येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवणार आहेत.

 

 

उर्वरित मृत पक्ष्यांना खड्ड्यांमध्ये दफन किंवा इन्सिनरेटर प्लांटमध्ये दहन त्यांची विल्हेवाट लावली जाणार आहे, अशा सूचनाही डॉ. भारती यांनी दिल्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.